डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याच्या विविध भागात उद्यापर्यंत अतिवृष्टिचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्यापर्यंत जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार ते अतिवृष्टिचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भुईबावडा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली. दरड हटवली असली तरी काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यानं अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात कालही पावसानं जोरदार हजेरी लावली. जाफ्राबाद तालुक्यात एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तेरणा प्रकल्प भरला असून नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे प्रशासनानं लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा