केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भाग आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाजवळच्या भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुढचे दोन ते तीन दिवस विजांचा गडगडाट आणि जोराच्या वाऱ्यांचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीच्या तुरळक भागांमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती राहील आणि त्यानंतर पारा खाली येईल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Site Admin | June 23, 2024 3:05 PM | Heavy rain | Weather Update