डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 18, 2024 12:53 PM | heavyrain | Uttar Pradesh

printer

उत्तरप्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तरप्रदेशात सततचा मुसळधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आलेल्या पुराचा फटका चोवीस जिल्ह्यातल्या पाच लाख लोकांना बसला आहे. राज्यातल्या जवळपास सर्व नद्यांना पूर आला असून गंगा आणि घागरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे. वाराणसी आणि प्रयागराजमधल्या हजारो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित केलं असून प्रशासनाकडून आवश्यक ती मदत त्यांना पुरवली जात आहे. वाराणसीतले सर्व घाट पाण्याखाली गेले असून नदीत नौकाविहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ च्या जवानांकडून मदतकार्य सुरू आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा