डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या, हिमालयाकडच्या भागांत, आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातल्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती राहील, तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढचे पाच ते सहा दिवस हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उष्णतेची लाट राहील .

सर्वाधिक वाचले

सर्व पहा