ईशान्य आणि पूर्व भारतात पुढच्या दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि केरळमध्ये पुढच्या चार दिवसात मुसळधार पाऊस पडेल. तर पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पावसाची स्थिती कायम राहील. उत्तर आणि मध्य भारतात मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू, हरियाणा आणि पंजाबमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस अति मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, लक्षद्वीप, दिल्ली आणि राजस्थानमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
Site Admin | July 10, 2024 3:16 PM | Weather Update
ईशान्य आणि पूर्व भारतात दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस
