उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
Site Admin | July 2, 2024 1:13 PM | Heavy rain | Weather Update