देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्टपर्यंत, तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढले ५ दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.