देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून येत्या चार दिवसात देशाच्या पूर्व,पश्चिम, वायव्य भागात तसंच मध्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय दक्षिणेकडील द्विपकल्प भागातही उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातही येत्या २३ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मध्य प्रदेशच्या ९ जिल्ह्यांमधे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता असून पूर, वादळ आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे.
महाराष्ट्रातही अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने कालपासून विविध ठिकाणी हजेरी लावली आहे.