महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात आज संततधार पाऊस सुरू आहे. राज्यातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.