डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ

राज्यात विविध ठिकाणी नद्यांच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधे पाणीसाठा वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून ६०९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे जलाशयापर्यंत प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे.

 

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २९ टी.एम.सी.पेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून सांडवा, कालवा आणि विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून ४२ हजार एकशे क्युसेक्स, वारणा धरणातून ८ हजार ९२ क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून ३ लाख ५० हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागानं कळवलं आहे.

 

कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरता ओसरता आज सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून धरणातून १०हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे.तुळशी धरणातूनही १५ हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा