येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पऊस पडेल असा अंदाज आहे. यवतमाळ, वाशिम, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्याकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जाला, बीड, लातूर, अकोला, बुलडाणा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.