डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 7, 2024 7:45 PM | Nashik | Rain

printer

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं.

 

गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुद्धा सध्या पाऊस थांबला आहे. पावसामुळे धरणातला पाणीसाठा वाढला असून गंगापूर, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी आणि केळझर या धरणामध्ये अद्यापही विसर्ग सुरू आहे. याशिवाय त्रंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, दिंडोरी तसंच कळवणमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर मध्ये सलग तीन दिवस शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याचं जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.

 

रत्नागिरी जिल्ह्याला संपूर्ण जुलै महिन्यात अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाचा जोर गेल्या आठवड्यात कमी झाला होता; मात्र आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. रत्नागिरी तालुक्यासह शहर परिसर, तसंच संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा, देवरुख आदी भागांमध्ये आणि लांजा तालुक्यातही चांगला पाऊस झाला. खेड तालुक्यातली जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर असून, आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा