कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढले काही दिवस जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढेल, तर मध्य महाराष्ट्रात, विशेषतः घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान विभागानं आज मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट, तर ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.