डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कोल्हापुरात पावसाची बॅटींग, पंचगंगा नदी दुथडी भरून वाहली

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू असल्यानं पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विविध धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या २० मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे.

 

बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत संततधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 

अकोला जिल्ह्यात पहाटेपासून पडणाऱ्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात हळूहळू जलसाठा वाढत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा