येत्या २ ते ३ दिवसांत देशाच्या पूर्व आणि वायव्य भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, झारखंड, बिहार, ओडिशा या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, पश्चिम राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधेही आज तर पश्चिम आणि मध्य भारतात येत्या २ दिवसांत जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Site Admin | August 6, 2024 3:06 PM | Heavy rain | IMD | India
येत्या २ ते ३ दिवसांत देशात पावसाचा अंदाज
