मुसळधार पावसामुळे आज गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याला प्राधान्य द्यावं अशा सूचना मुख्यमंत्री पटेल यांनी या बैठकीवेळी दिल्या. भारतीय हवामान विभागानं पुढच्या पाच दिवसांत गुजरातमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातल्या २८ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Site Admin | August 26, 2024 8:18 PM