दिल्लीच्या काही भागात काल रात्री मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडला असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराच्या उत्तर आणि लगतच्या मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून पश्चिमेकडील ओडीसाच्या दक्षिणेकडे आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Site Admin | August 29, 2024 1:51 PM | Heavy rain | Weather Update