देशातल्या २२ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशातला काही भाग तसंच गोवा, कर्नाटक आणि केरळ इथल्या अनेक ठिकाणी आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर ईशान्येच्या राज्यांमध्ये ‘उद्या’ यलो अलर्ट जारी केला आहे. गेले काही दिवस गुजरातमधे जोरदार पाऊस सुरु असून यात आत्ता पर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सखल भागातल्या सुमारे पंधरा हजार पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पूर स्थिती उद्भावली असून अनेक गावांमधे पाणी शिरलं आहे.
Site Admin | August 28, 2024 1:46 PM | Weather Update
देशातल्या २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
