डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 3, 2024 3:18 PM | Andhra Pradesh | Flood

printer

आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या  पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. 

 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल रात्री राज्यातल्या पुरस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजयवाडा आणि हैदराबादला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. तसंच  विजयवाडा – काझीपेट दरम्यानची रेल्वे सेवा आज संध्याकाळपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा