तामिळनाडूजवळ चेन्नईपासून 320 किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
चेन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लुर आणि चेंगलापेट जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू प्रशासन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तटरक्षक दल तसंच राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.