पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं उद्यापर्यंत आसाम, मेघालय, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेशात तर राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, नागालँड आणि मणिपूरच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आंध्र प्रदेश किनीरपट्टी, तेलंगणा, मराठवाडा आणि तामिळनाडू इथं पुढील ५ दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्लीच्या काही भागात आणि गाझियाबाद, छपरौला, ग्रेटर नोएडा, मेरठ, मोदीनगर, पिलाखुआ, हापूर, सिकंदराबाद, बुलंदशहर, फरिदाबाद, बल्लभगढ हलका ते मध्यम पाऊस झाला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.