भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान संस्थेने वर्तवला आहे.