केरळच्या कण्णूर आणि कासारगोड जिल्ह्यांमधे आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर केरळात सर्व जिल्हा मुख्यालयांमधे नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत. दरम्यान मुसळधार पावसामुळे केरळच्या उत्तरभागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांची आणि इतर जलाशयांची पाणीपातळी वाढली असून रहिवासी क्षेत्रातही पाणी शिरलं आहे. भात आणि कडधान्य पिकांना याचा फटका बसला आहे. सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित जागी हलवण्याचं काम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या करत आहेत. आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहील असा अंदाज असल्यानं राज्यात शाळा महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
Site Admin | December 3, 2024 2:29 PM