डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता

 

भारतीय हवामान विभागानं देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, वायव्य आणि ईशान्य भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढल्या ५ दिवसांत देशाच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, उत्तर ओदिशा, छत्तीसगडमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान काल संध्याकाळी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडला असून आजही दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा