भारतीय हवामानशास्त्र विभागानं येत्या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटकचा किनारपट्टीलगतचा भाग आणि कराईकलमध्येही 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसांत राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारीसाठी हवामान अनुकूल होत असल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे.
Site Admin | October 2, 2024 10:41 AM | Heavy rain forecast
येत्या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज
