हवामान विभागानं ओदिशा, आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि तेलंगणा मध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी तीन दिवसांत तेलंगण, ओदिशा आणि मध्य महाराष्ट्रात अत्यधिक ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ईशान्य भारतात आगामी सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरल, माहे, दक्षिण कर्नाटक तसंच कर्नाटकचा किनारपट्टीकडचा भाग इथे येत्या सोमवारपर्यंत तर मध्य प्रदेशात आगामी सात दिवसांपर्यंत हीच स्थिती राहू शकेल. या आठवड्यात दिल्लीच्या आसपास तसंच पश्चिम आणि मध्य भारतामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता आहे.
Site Admin | September 7, 2024 8:22 PM | Weather Update
देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज
