डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 8, 2024 6:58 PM | पाऊस

printer

राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शहरात आज दुपारी पावसानं विश्रान्ती घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. राजाराम बंधारा ३० फुटांवर असून नदीची इशारा पातळी ३९ आहे. जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण ४३ टक्के भरलं आहे. कोल्हापूर बाजारभोगाव राजापूर राज्यमार्ग बंद झाला आहे.

मुसळधार पावसामुळे ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथं एनडीआरएफची पथकं  तैनात करण्यात आली आहेत. 

रायगड जिल्ह्यात  जोरदार पाऊस  होत असून नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. रायगड किल्ला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे आज पासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संततधार पाऊस होत असून जनजीवनविस्कळीत झालं आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कुडाळ नजीक पावशी इथं महामार्गावर पाणी आल्यामुळे १४ तास ठप्प असलेली वाहतूक  आता सुरळीत झाली आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल अकोला जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातल्या खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागणार असल्यानं शेतकरी आनंदात आहेत. मात्र, चांदूर – खडकी परिसरात काल अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतात पाणी साचून भाजीपाला पाण्याखाली गेला. जिल्ह्यातल्या मोर्णा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट दिली. आणि  पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना  प्रशासनाला दिल्या.  

नाशिक- मुंबई महामार्गावर पावसामुळे वाहतूक ठिकठिकाणी खोळंबली असून रेल्वे मार्गावरच्या लांब पल्ल्याच्या दोन गाड्या रद्द झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथं एनडीआरएफची पथकं  तैनात करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात  जोरदार पाऊस  होत असून नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे.

हवामान खात्यानं मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि मुक्त अभ्यासक्रमाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या असून या परीक्षा आता १३ जुलैला होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा