हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या ३७ दिवसांत ढग फुटी, पूर आणि भूस्खनाच्या एकूण ४७ घटना घडल्या आहेत. राज्यात २२ ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. १७ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना तर ८ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांत १० जणांचा मृत्यू, ४ जण जखमी तर ४६ जण बेपत्ता झाले आहेत. १२० घरांचं नुकसान झालं असून ६४ घरं पूर्ण नष्ट झाली आहेत.
या शिवाय ढगफटीमुळे १४ दुकानं वाहून गेली आहेत. २२ गोठ्यांचं नुकसान झालं असून ५४ म्हशी यात मृत्यू पावल्या आहेत. दरम्यान, सिमला, मंडी आणि कुल्लू जिल्ह्यांतल्या बेपत्ता लोकांचा आज चौथ्या दिवशीही शोध सुरु आहे.राज्याच्या मैदानी आणि मध्यम पर्वतीय भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागात पर्यटकांनी जाऊ नये, अशा सूचना हवामान विभागानं पर्यटकांना आणि नागरिकांना दिल्या आहेत.