डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 21, 2024 7:52 PM

printer

पुढील दोन दिवसांत आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

पुढील दोन दिवसांत आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढील २४ तासांत केरळला मुसळधार तर लक्षद्वीप इथं अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानचा पूर्व भाग, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली इथंही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेश, कोकण, गोवा आणि गुजरातच्या काही भागांत पुढील सात दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा