कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमानात किंचित वाढ झाली, रात्रीचं तापमान सरासरीइतकंच होतं.
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे तर याच कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नागपूर आणि अकोला जिल्ह्याला हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.