राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
Site Admin | April 8, 2025 6:59 PM | heat wave | IMD
राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज
