उत्तर प्रदेश, बिहार ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ,विदर्भ आणि पश्चिम बंगालचा काही भाग इथे येत्या शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ईशान्य भारतासह, पूर्व राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली इथे हवेतला उष्मा कायम राहण्याचा तर पूर्वेकडे तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारतात या काळात कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, रायलसीमा, केरळ, तामिळनाडू या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे.
Site Admin | April 24, 2025 1:58 PM | heat wave | weather updat
देशातल्या ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता
