डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा तर दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढचे चार ते पाच दिवस भारताच्या वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात ९ एप्रिल पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या ९ तारखेपर्यंत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज ओडिशा, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटांवर मेघगर्जनेसह पाऊस तर केरळ, माहे, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत काल धुळीचं वादळ आलं. धुळीच्या वादळाचा शहरातल्या वाहतूक आणि रेल्वे सेवांवर परिणाम झाला. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं आज राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा