डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताच्या काही भागात पुढील २ दिवस उष्णतेची लाट

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तर मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशचा किनारी भाग, राजस्थान, विदर्भ आणि पश्चिम बंगालच्या विविध भागांत उष्णेतेची तीव्र लाटेची शक्यता आहे.

 

दरम्यान, आगामी तीन दिवस पश्चिम बंगालचा काही भाग, आसाम, मेघालयात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढचे पाच दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरातही पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा