भारतीय हवामान विभागाने आज राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हरयाणा, चंडिगढ, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
Site Admin | April 8, 2025 3:46 PM | heat wave
देशातल्या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट
