डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातल्या ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशातल्या २१ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशासह अन्य भागांतही उष्णतेच्या झळा तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये रात्रीही तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित गुजरात, उर्वरित राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि  गोव्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

 

यादरम्यान, पश्चिम बंगालच्या आग्नेय दिशेला उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होत असल्याचं निरीक्षणही हवामान विभागाने नोंदवलं आहे. पुढच्या दोन दिवसात या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढेल. त्यामुळे आजपासून पुढचे दोन दिवस कोलकात्यासह दक्षिण बंगालमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा