राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असून संभाव्य उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरच्या साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यात २१ मार्चपर्यंत उष्माघाताचे २१ रुग्ण आढळून आले आहेत.
Site Admin | March 25, 2025 7:17 PM | heat wave
उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचा इशारा
