येत्या दोन दिवसात विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर तेलंगणा, पश्चिम बंगाल, सौराष्ट्र तसंच कच्छ या भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ओदिशालाही आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला असून पुढचे दोन दिवस झारखंड आणि पश्चिम बंगालला यलो अलर्ट देण्यात आहे.
दरम्यान, उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.