काँग्रेस नेता राहूल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. याच संदर्भात अलाहबाद उच्च न्यायालयातही सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा अहवाल न्यायालयाने मागवला आहे.
राहूल गांधी हे ब्रिटनमध्ये २००३ मध्ये नोंदणी झालेल्या एका कंपनीच्या निर्देशकांपैकी एक होते. या कंपनीने २००५ ते २००६ मध्ये वार्षिक आयकर प्रपत्रामध्ये राहूल गांधींचा उल्लेख ब्रिटीश नागरीक म्हणून केल्याचं या याचिकेत नमूद केलं आहे.
Site Admin | October 9, 2024 2:25 PM | दिल्ली उच्च न्यायालय | नागरिकत्व रद्द | राहूल गांधी