डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातली  आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून  हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं  ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. मुंबईत आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्करोग निदान आणि उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी, कर्करोगावर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा