देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागात १ लाख ६९ हजार आरोग्य उपकेंद्र, जवळपास ३२ हजार प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि सहा हजारांपेक्षा जास्त सामुदायिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी नवी दिल्लीत आज हा अहवाल प्रसिद्ध केला. याशिवाय १ हजार ३४० उपविभागीय आणि जिल्हा रुग्णालय, ७१४ जिल्हा रुग्णालय, ३६२ वैद्यकीय महाविद्यालय आहेत.
उपकेंद्रांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ४१ हजार डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी, तर सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये २६ हजार विशेषज्ञ आणि आरोग्य अधिकारी सेवा देतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ४८ हजार तर सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये ५१ हजार परिचारिका कार्यरत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशभरातल्या उपविभागीय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ४५ हजारांपेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी काम करतात.