देशात एका नागरिकाला मंकीपॉक्स आजाराच्या एमपॉक्स क्ले़ड दोनची लागण झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या तरुण व्यक्तीनं मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशातून प्रवास केला असल्यानं त्याला हा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. सर्वसामान्य लोकांना कोणताही धोका असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. सार्वजनिक आरोग्याला धोका उद्भवू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशात जुलै 2022 पासून नोंदवल्या गेलेल्या 30 प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरण वेगळे असून जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलेल्या मंकीपॉक्सच्या क्लेड एकशी संबंधित सार्वजनिक आरोग्य आणीबाणीशी संबंधित नाही, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | September 10, 2024 9:54 AM | Health Ministry | Mpox Clade 2