जागतिक लोकसंख्येचं आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अन्नसुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे, असं प्रतिपादन आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिटच्या दुसऱ्या आवृत्तीचं बोधचिन्ह आणि माहिती पत्रकाचं अनावरण करताना ते बोलेत होते. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे १९ ते २१ सप्टेंबर या दरम्यान शिखर परिषदेचं आयोजन होणार असल्याची माहिती देखील नड्डा यांनी यावेळी दिली. तसंच, अन्न सुरक्षा आणि नियमनाच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातली तांत्रिक प्रगती, संभाव्य धोके आणि ग्राहकांच्या बदलत्या मागण्या लक्षात घेऊन अनुकूलनावर भर देण्याची गरज यावेळी नड्डा यांनी अधोरेखित केली.
Site Admin | September 17, 2024 7:53 PM | food safety on the global stage | Health Minister JP Nadda