कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी तज्ज्ञांकडून कर्करोग आजारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.