आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल, देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलंय.
उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा दिली जाईल,असंही यात म्हटलं आहे.