राज्यातल्या नागरीकांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आणि आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करुन आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होते.