देशातल्या नागरिकांचा आरोग्यविषयक खर्च गेल्या दहा वर्षांत ६४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद २०२५ या उपक्रमाच्या १२ व्या पर्वाला संबोधित करत होते.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इतर योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे ही घट झाली असल्याचं ते म्हणाले. सद्यस्थितीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत देशातल्या सुमारे ४० टक्के लोकसंख्येला लाभ मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.