डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत फूटबॉलमध्ये हरियाणा, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीची आपापल्या गटात विजयी सलामी

फूटबॉलमधे हरियाणा, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीने आपापल्या गटात विजयी सलामी दिली आहे. गट अ मधे हरियाणाने तामिळनाडूला ७-० अशा मोठ्या फरकाने हरवलं. तर ओदिशाने सिक्कीमवर ५-१ अशी मात केली. गट ब मधे पश्चिम बंगालने यजमना उत्तराखंडला २-० नं हरवत स्पर्धेत आगेकूच केली आहे. या सामन्यात पश्चिम बंगालने सुरुवातीपासूनच उत्तराखंडवर वर्चस्व राखलं. गट ब मधल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघाने मणिपूरला २-१ ने नमवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा