डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पोलीस आणि इतर विभागातल्या काही पदांवर थेट भर्तीत अग्निवीरांना १० % समांतर आरक्षण, हरयाणा सरकारची घोषणा

पोलीस, खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांवर थेट भर्ती करताना, हरयाणा सरकार अग्निवीरांना १० टक्के समांतर आरक्षण देणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज चंदीगढ इथे वार्ताहरांशी बोलताना ही घोषणा केली. हरयाणातल्या पोलिस हवालदार, खाण रक्षक, वनरक्षक, कारागृह अधीक्षक आणि विशेष पोलिस अधिकारी, या पदांचा यात समावेश आहे, असं ते म्हणाले.

 

ड गटात भर्ती करताना, अग्निवीरांना वयात ३ वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल, असंही त्यांनी सांगितलं. अग्निवीरांना गट क मध्ये पाच टक्के, आणि ब गटात एक टक्के आरक्षणही, त्यांनी जाहीर केलं.

 

कोणत्याही औद्योगिक कारखान्यानं अग्निवीरांना दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला, तर सरकार त्या कारखान्याला वार्षिक ६० हजार रुपये अनुदान देईल, याशिवाय कोणत्याही अग्निवीरानं स्वत:चा उद्योग उभारला तर त्याला ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाईल, अग्निवीरांना प्राधान्यानं शस्त्र परवाना दिला जाईल, असंही सैनी यांनी जाहीर केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा