हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
आज प्रचारासाठीच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला.
भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जींद जिल्ह्यात तीन ठिकाणी जन आशीर्वाद रॅलीत सहभागी होत, भाजपा उमेदवारांसाठी मतं मागितली. भाजपाच्या शहाबाद इथल्या प्रचारसभेत खासदार नवीन जिंदाल सहभागी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार दीपेंद्र हुड्डा, राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही पक्षासाठी प्रचार सभा घेतल्या. राहुल गांधी यांनी नूंह आणि महेंद्रगड इथल्या प्रचारसभांना संबोधित केलं. संविधानानं गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांचं रक्षण केलं आहे, मात्र भाजप संविधान बदलण्याची तयारी करत आहे असा आरोप त्यांनी केला.
भाजपाचे नेते अशोक तंवर यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.